Melbourne 2
*Tour MCG ची*
6 एप्रिल 2025, रविवार, आज 11 वाजताची MCG टूरची तिकिटे नीरजने काढली होती. तिकीट 37 AUD इतरांना आहे व जेष्ठ नागरिकांना 25 AUD. प्रथमच जेष्ठ नागरीक असल्याचा आनंद झाला. तिकीट जेष्ठ नागरिकांचे काढले होते पण उत्साह मात्र चाळीशीचा होता.
सकाळी नेहमी सारखी 6.30 वाजता जाग आली. उठणार तेंव्हाच लक्षात आले की आज घड्याळ एक तास मागे जाणार आहे म्हणजे अजून 5.30 वाजले आहेत. घड्याळ Auto Adjust केले तेंव्हा 5.30 ची वेळ दर्शवली व परत अजून एक तास झोपायचा प्रयत्न केला.
सकाळी 9 वाजता निघायचं ठरले होते. आमचे घर ट्रगनींना ह्या उपनगरात आहे. तिथून टारनेट ह्या उपनगराचे स्टेशन 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. सकाळी 9 वाजता आम्ही बाहेर पडलो ते 9.27 ची ट्रेन टारनेट इथून गाठायचे ह्या हेतूने.
9.27 ची ट्रेन आम्हाला अचूक मिळाली. ही रेल्वे ज्याला इथे V line म्हणतात. इथे काही उपनगर मेट्रोनी जोडली आहेत तर काही V Line म्हणजे Regional ट्रेननी. हा 26 मिनिटाचा प्रवास होता. 26 मिनिटांनी आमची ट्रेन Southern Cross ह्या स्टेशन वर पोहोचली. Southern cross हे आपल्या मुंबईतील VT स्टेशन सारखे आहे. सर्व train इथूनच निघतात. पुढे Eltham ला जाणारी मेट्रो पकडून पुढे जोलिमन्टला उतरायचे होते. Jolymont मेट्रो स्टेशन पासून MCG stadium साधारण 300 मीटर अंतरावर आहे. आम्ही ह्या दोन्हीही ट्रेनचा प्रवास पूर्ण करुन आम्ही साधारण 10.20 वाजता MCG ला पोहोचलो. ह्या स्टेडियमला 7 Gates आहेत. आमची Tour 11 वाजता नियोजित होती व त्यासाठी Gate no 3 मधून आम्हाला प्रवेश मिळणार होता.
(क्रमशः)
एमसीजी चा प्रवेश म्हणजे दिव्य स्वप्नच, पूर्ण ऑस्ट्रेलिया भ्रमण करा,
ReplyDeleteVery nice , enjoy the tour with beloved ones.
ReplyDeleteक्रिकेट यात्रा स्थळाला भेट!!
ReplyDeleteभाग्यवान आहेस👍👍