Melbourne 1
*चुकवू नये असें काही*
Melbourne, ऑस्ट्रेलिया देशातील एक प्रमुख शहर. शहराच्या मध्य भागातून वाहणारी *यारा नदी* त्याच्या काठावर असेलेले *Sea Life Aquarium* हे *चुकवू नये असें काही* ह्या सदरात मोडणारे प्रमुख प्रेक्षणीय स्थळ.
Melbourne च्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले *Southern Cross* हे रेल्वे स्टेशन, इथून Melbourne शहरात सर्व भागात जाणाऱ्या मेट्रो व regional train इथून सुटतात. ह्या स्टेशन पासून साधारण 700 Mtr वर हे Aquarium वसलेलं आहे.
ह्या ठिकाणी, Entry Fee 38 Aud पासून 50 Aud पर्यंत आहे. आम्ही गेलो त्या दिवशी रविवार होता व शहरात Car Race असल्यामुळे खूप गर्दी होती. त्यामुळे आम्हाला त्यादिवशी Entry करण्यासाठी Aud 50 मोजायला लागले.
ऑस्ट्रेलिया देशाला साधारण 14500 Km चा समुद्र किनारा लाभलेला आहे. देशाच्या दक्षिण व पूर्व दिशेला हा अथांग महासागर पसरलेला आहे. ह्या *Sea Life Aquarium* मध्ये ऑस्ट्रेलियाच्या महासागरात आढळणारे मासे आढळतात. महासागर साधारण 3 झोन मध्ये विभागलेला असतो, पहिला झोन *Sunlight झोन* जो समुद्र किनाऱ्यापासून 200 Mtr पर्यंत असतो, नंतर *Twilight झोन* जो 200 mtr पासून 1000 Mtr पर्यंत असतो व तिसरा *Midnight झोन* जिथे सूर्यप्रकाश अजिबात पोहोचत नाही असा झोन.
हा aquarium जमिनीखाली 4 level मध्ये तयार केलेला आहे. ह्या ठिकाणी असें तीनही water झोन तयार केलेले आहेत, जे पूर्णतः नैसर्गिक वाटतात व त्यामध्ये आढळणारे मासे तिथे आहेत. माश्याच्या 550+ प्रजाती व साधारण 10000+ मासे इथे आढळतात. ह्यांचा आकार साधारण काही इंचा पासून 15 Mtr पर्यंत आहे. आपण महासागरात खोल वर गेलेलो आहोत व आजूबाजूला हे मासे फिरत आहेत असा आभास आपल्याला निर्माण होतो.
माश्याना लागणाऱ्या *पाणवनस्पती* ह्या मुबलक उपलब्ध आहेत. तसेच निरनिराळ्या प्रकारचे *star fish*, *डॉल्फिन* व *देवमासे* इथे विहार करताना दिसतात. तसेच सर्वात मोठा *सूर्यमासा, ज्याचा आकार 3 मीटरचा असतो व वजन 2000 किलोचा असतो* हा पण इथे विहार करताना आढळला. ह्या माश्याचे *व्युत्पत्ती केंद्र* पण इथे आहे.
@जयंत केसकर
Interesting
ReplyDeleteछान लिहिलंय.
ReplyDelete- विठ्ठल कुलकर्णी
व्वा, नशीबवान आहेस,खूपच छान अनुभव असेल,बघू आमचा योग असेल तर नक्की पाहू.
ReplyDeleteखूप सुंदर वर्णन. जयंत, धन्यवाद.तु लिहील्या मुळे आम्हाला आपणच पहात आहोत असं वाटतयं. लिहीत रहा.
ReplyDeleteछान, सुंदर माहिती..... समुद्र सफर झाली
ReplyDeleteNice post
ReplyDelete