Tarrif युद्ध
🌎🌏🌏
💫जग तिसऱ्या महायुद्धाकडे झपाट्याने वाटचाल करत आहे. इतके दिवस अमेरिका व सर्व EU देश हे consumption economy चे पुरस्कर्ते होते व अजूनही आहेत. अमेरिकेने गेले कित्येक वर्ष Deficit मध्ये राहून सरकारी खर्च पण खूप केले, त्याचा परिणाम सध्या अमेरिकेवर इतके कर्ज झाले आहे की आता जवळ जवळ त्यांच्या GDP एव्हढे त्यांच्या वर कर्ज आहे.ह्या मुळे इतके वर्ष चीनने हात धुऊन घेतला व जेवढं उत्पादन करत होते तेवढे सर्व विकले जातं होते. आजच्या दिवशी चीन अमेरिकेचा सर्वात मोठा कर्जदाता देश आहे. पण Trump ने उघड उघड चीनविरुद्ध दंड थोपटल्यामुळे 💪 आता चीनची थोडी गोची झाली आहे. काल Trump ने इतर देशावरील Tariff चे issue चर्चेने सोडवूत हे सांगताना Tariff चा निर्णय 90 दिवसांनी पुढे ढकलला व चीन वरचा tariff 125% केला. चीन एवढ्या सहजतेने माघार घेणार नाही हे स्पष्ट आहे. 🤼
तसेच US ने इराण ला दिलेली धमकी, त्यावर रशियाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया, त्या धर्तीवर काल नेतान्याहू ट्रम्प ची झालेली Meeting, दक्षिण आफ्रिकन रिप्रेझेन्टॅटिव्हची ट्रम्प विरोधी केलेल्या निवेदना बद्दल केलेली अमेरिकेतून केलेली हकालपट्टी. दक्षिण आफ्रिकेने Land equality चा केलेला कायदा व त्याला अमेरिकेने केलेला विरोध व सर्वात मुख्य म्हणजे ट्रम्प ह्यांचा Ego 😠हे सर्व आपल्याला वेगाने तिसऱ्या महायुद्धा कडे 💥घेऊन जात असल्याचे द्योतक आहे.
पण ह्यात भारत जोडगोळी मोदी जयशंकरने जो संयम दाखवला आहे व सर्व जगाला आपल्या सुरांवर सुर मिसळायला लावले आहेत ह्याचा फायदा पुढील काळात भारताला निश्चित होईल.
चीन भारत ह्यांची 5 वर्षानंतर Direct चालू झालेली विमानसेवा,✈️ बरच काही सांगून जाते. चीन भारत ह्यांची वाढणारी जवळीक अमेरिकेला नक्कीच परवडणार नाही हे खरे आहे.
© जयंत केसकर
छान लेख लिहिला आहे. तिसरे महायुद्ध साधारण कधी होणार आहे?
ReplyDeleteलेख छानच लिहिला आहे... पण तिसरे महायुद्ध नेमके कधी होणार हे जरा महिनाभर आधी कळलं तर बरं होईल.
ReplyDeleteकेसकर साहेब,लेख छान! एकच सुचवावंसं वाटतं, अमेरीकेचं कर्ज हे जिडीपी पेक्षा अधिक आहे. करंट अकाऊंट डेफीसीट,ट्रेड डेफीसीट सारे मापदंड विरोधात आहेत.नोटा छापून काम सुरू ठेवण्याचा वाईट परिणाम ट्रंप साहेबांना जाणवू लागला आहे.
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteलेख छान लिहिला आहे.... विनायक जोशी
ReplyDeleteअप्रतिम लेख,सोन्याच्या किमतीविषयी बरेच वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत,आपलं मत काय आहे??
ReplyDeleteसुंदर लेख
ReplyDeleteNice blog
ReplyDeleteमाहितीपूर्ण लेख
ReplyDeleteमाहितीपूर्ण लेख आहे, ट्रम्प साहेबांना लवकर शहाणपण येऊ दे ही प्रार्थना 🙏
ReplyDeleteमाहितीपूर्ण लेख आहे, ट्रम्प साहेबांना लवकर शहाणपण येऊ दे ही प्रार्थना 🙏
ReplyDeleteलेख छान लिहिला आहे. अमेरिकेच्या दृष्टीने बघितल्यास हे कधीतरी होणार हे अटल आहे. शेवटी एवढा कर्जाचा बोजा डोक्यावर घेऊन किती वर्ष अमेरिका तग धरणार. कदाचित ही परिस्थिती सुधारण्याची पद्धत चुकीची असू शकते. ट्रम्प साहेबांच्या बाबतीत बोलायचे तर अतिशय unpredictable personality. आणि त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आता ही कुठल्या प्रकारे वळण घेईल हे predict करणे अवघड. मात्र ह्या मधून नवीन geo-political समीकरणे निर्माण होणार हे निश्चित. कदाचित ह्यामुळे अमेरिकेतील अन्तर्गत समीकरणे सुध्दा बदलू शकतात
ReplyDeleteVery thoughtful blog. 3rd world war पूर्ण जगासाठी घातक आहे अन् अमेरका तर superpower. देवा Trump साहेबांना बुद्धि दे रे बाबा!!
ReplyDeleteKhup chaan
ReplyDeleteGood information in brief to the point
ReplyDeleteछान, माहितीपूर्ण लेख.
ReplyDelete- विठ्ठल कुलकर्णी