जलोटा
*मला भेटलेल्या व्यक्ती*
बँकेत साधारण 39 वर्ष 2 महिने नोकरी केली, निरनिराळी ठिकाणे, वेगळे काम, वेगळे वरिष्ठ अधिकारी पाहिले. त्यातलेच एक *जलोटा* ह्यांच्या बद्दल मी लिहीत आहे.
मी गांधीनगरला 3 सप्टेंबर 2017 ला जॉईन झालो. ह्या दिवशी मी गांधीनगर शाखेत रुजू झालो, नंतर 21 जून 2018 ला *जलोटा* साहेबांच्या office मध्ये *Credit Dept Incharge* म्हणून झोनल office मध्ये जॉईन झालो व नंतर दररोज साहेबांशी संबंध येऊ लागला.
*जलोटा* साहेब, अतिशय कमी बोलायचे. चेहऱ्यावर सतत स्मित हास्य असायचे. केबिन अतिशय व्यवस्थित ठेवलेले असायचे. दिवसाच्या सुरुवातीला व संध्याकाळी जाताना टेबलं वर एकही फाईल नसायची. म्हणजे जेवढ्या फाईल यायच्या तेवढ्या पूर्ण dispose झालेल्या असायच्या. सकाळी बरोबर 10 वाजता office मध्ये यायचे व 7 वाजता बाहेर पढायचे. आठवड्यात एकदा Dept चा review व्हायचा, छोट्यातल्या छोट्या pending मेमो बद्दल उहापोह व्हायचा, त्याच्या disposal ची timeline द्यायचे व नंतर त्याचा follow up, अतिशय शिस्त प्रिय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करायचा छान अनुभव होता.
पण हे अतिशय कमी बोलायचे. मी त्यांच्या शेजारी राहायचो, बाहेर भेटल्यावर कधीही ओळख दाखवायचे नाहीत. सगळ्या बाबतीत अतिशय अलिप्त.
16 सप्टेंबर 2018, रविवार व गणेश चतुर्थीचा दिवस. नीरज गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एक आठवडा मुंबईला येणार होता. मला चार दिवस सुट्टी हवी होती पण जलोटा साहेबांनी दिली नाही. सोमवार मंगळवारी सुट्टी घ्या पण बुधवारी परत या व गुरुवारी जा असें म्हणाले. 21 सप्टेंबर शुक्रवार ते रविवार public holiday होता. मी ऐकलं व गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता निघताना जातो असं सांगायला गेलो. मला परवानगी दिली पण सोमवारी परत office ला नक्की येण्यासाठी बजावले. गुरुवारी रात्री मी पुण्यात आलो व शुक्रवारी दुपारी 12 वाजता त्यांनी आत्महत्या केली असल्याची बातमी आली. त्यांनी सकाळी 10.15 वाजता घरात गळफास घेतला होता. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही अशी एका ओळीची चिठ्ठी जी 16 तारखेला लिहून खिशात ठेवली होती. मला गुरुवारी येताना त्यांचा स्मित हास्य चेहरा व सोमवारी सकाळी परत कामावर यायचं घेतलेलं आश्वासन आठवले, ज्या माणसाचं दुसऱ्या दिवशी आत्महत्या करायचे ठरले असून त्या व्यक्तीचा चेहरा एवढा का निर्वीकार असावा.
ह्या प्रसंगा पूर्वी एक महिना ते कोलकत्ता इथे असताना एका sanction account मध्ये आढळून आलेल्या काही त्रुटी बद्दल explanation call केलेलं होतं, त्यांची सेवानिवृत्ती ऑक्टोबर मध्ये होणार होती, शेवटच्या महिन्यात असं explanation call करण त्यांना पटलेलं नव्हते, ह्या बद्दल नाराजी माझ्या बरोबर व अजून दोन लोकांसमोर बोलून दाखवली होती पण, हे केवळ आत्महत्येचे कारण असावे हे पटत नव्हते.
तर अश्या एका उत्कृष्ट पण निर्वीकार, अलिप्त, अबोल व्यक्तीने आत्महत्या का केली असावी व त्याचे खरे कारण काय असावे हे अजून 7 वर्षांनी पण अनुत्तरीत आहे............
अतिशय हृदयस्पर्शी वास्तव कथा. मला अजूनही वाटते की त्या व्यक्तीने असे पाऊल उचलण्यास भाग पाडले तेव्हा काय होत असेल. कोणीही विचारी व्यक्ती असे भाष्य करेल की जो खरोखरच आपले जीवन संपवण्यासाठी टोकाचे पाऊल उचलतो तो डरपोक असावा. पण मला असे वाटते की त्याच्यात इतके कठोर पाऊल उचलण्याची कमाल हिम्मत आहे. या पायरीमागील खरा कारण कोणालाच कळत नाही.
ReplyDeleteमी माझ्या कुटुंबात अशी घटना पाहिली आहे पण इतक्या वर्षांनंतरही खरे कारण कोणालाच कळले नाही.
छान प्रतिक्रिया
Deleteनमस्कार,
Deleteआशा घटनांबद्दल काहिही व्यक्त करणे, कठीण आहे. घटणे नंतर कारण शोधणे, म्हणजे पुन:राव्रुत्ती टाळणे इतकेच आहे.
आशा घटणा आपणास पण काही काळ संभ्रमित करतात.
पण तुला का आठवल हे ?
जयंत आता आपण कोणी नाहीयेत, आपण फक्त, नवरा, बाप, मुले, इतकेच होत. नको आठवुन या गोष्टी, हा, मी इतकेच सांगेन की आठवल्या की ताबडतोब आमच्याशी बोल, आम्हा सांग, आम्ही त्या तुझे कसेही असो, म्हणजे चांगले,वाईट, निरर्थक, उपयोगी, सगळे,सगळे, आपलेपणाने एकुत वाटुन घेउ..
जाउदे सोड, (शेजारणी कडे बघ).
आणि मजेत गप्पा मारणे साठी फोन कर, कसलाही संकोच न बाळगता.
आणि भेटुत रे सगळे, आपणास काय ? काय पुणे आणि सोलापुर आणि माळ पण आपण आता विना सायास भेटत जाउ.
नमस्कार, चमत्कार, इत्यादी,इत्यादी...
अरेरे, फारच दुर्दैवी.
ReplyDeleteअसतात काही मनस्वी लोक.
काही वेळेला आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता देता खचून जातात.