Budget 25-26 (1)

 *देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारने उचललेली ठोस पावले*


आत्ताच्या काही Economic survey नुसार असं दिसतंय की *चलनवाढ* ही कमी झाली आहे कारण *मागणी* कमी आहे. यामुळे आपल्या देशातील *आर्थिक विकासाचा वेग* थोडा कमी झाला आहे. हा वाढवण्यासाठी सरकार व RBI ने सध्या काय उपाय योजना केल्या आहेत ते आपण बघूयात.


१) प्रथम सरकारने open money operations मधून बँकेकडे असलेली Liquidity वाढवली आहे, म्हणजे थोडक्यात Economy मध्ये circulation मधे उपलब्ध असलेला पैसा वाढवला आहे.


२) १एप्रिल २०२५ पासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षात आयकारात खूप मोठी सूट दिली आहे. यामुळे मध्यम वर्गीय जनतेच्या खिशात पैसा वाढेल, म्हणजेच त्यांची खर्च करण्याची ऐपत आहे ती वाढेल. खिशात पैसा जास्त शिल्लक राहिल्यामुळे कपडे, दागदागिने, वाहन खरेदी घर सजावट, पर्यटन अश्या व तत्सम sector मध्ये 

 *मागणी* वाढेल व त्यामुळे बऱ्याच कंपन्यांचा Revenue वाढेल  व त्याप्रमाणात  नफा वाढेल.


काही टिकाकारांनी IT collection कमी झाल्याने आर्थिक तूट वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे, पण consumption वाढल्याने GST collection मध्ये वाढ होईल व त्यामुळे विक्रेते व Corporate tax revenue वाढेल या गोष्टी विसरु शकत नाही.


३) RBI ने  Rate Cut केला आहे व आगामी काळात अजून Cut होईल हे पण सांगितले आहे.  त्यामुळे मध्यम वर्गीय जनतेचा EMI कमी झाल्यामुळे हा पैसा पण मध्यमवर्गीयांचा खिसा अजून मजबूत करणार आहे. त्यामुळे पण  Consumption वाढेल व त्याबरोबर मागणी वाढेल. या सर्व बाबी वरील आर्थिक विकासात भर घालतील.



© *जयंत केसकर*

     पुणे

Comments

  1. छान 👍
    - विठ्ठल कुलकर्णी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जलोटा

Tarrif युद्ध

Melbourne 1