एक अविस्मरणीय दिवस
*एक अविस्मरणीय दिवस*
काल ह दे 78 च्या बॅच मधील सर्व मुला मुलींची सामुदाईक एकसष्टी काल अभिषेक मळा संपन्न झाला. अतिशय हृद्य कार्यक्रम झाला साधारण 75 जणांची सामुदाईक एकसष्ठि होण्याचा हा पहिलाच व एकमेव कार्यक्रम असावा. अभिषेक मळ्याचे सर्वे सर्वा श्री राजाभाऊ भंडारकवठेकर हे पण आमचे वर्गमित्र. हा कार्यक्रम त्यांच्या पुढाकाराने व पूर्ण कार्यक्रम त्यांनी स्पॉन्सर केला होता.
आमच्या ह्या ग्रुप मध्ये कोणीतरी काही कल्पना व्यक्त करायची व बाकी सर्वांनी ती सिद्धीला न्यायची हा आता एक पायांडाच पडला आहे.
कालच्या कार्यक्रमाला निमच, बेंगलोर, पुणे, मुंबई, कोल्हापूर व इतर सर्व भागातून आले होते. कितीतरी मुला मुलींचे partners आता ह्या जगात नाहीत, त्यांची एकसष्ठि होणार नाही हे माहिती आयोजकांना माहिती होते, म्हणून हा एक यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.
हल्लीच्या जगात जवळच्या नातेवाईक पण पुढाकार घेऊन अस आयोजन करत नाहीत, पण कोणा एके काळी एकत्र तीन चार वर्ष घालवलेले मुलं मुली एकत्र येऊन असा कार्यक्रम साजरा करणे हा स्तुत्य उपक्रम होता.
कार्यक्रमाची सुरुवात नाष्टा व फळाहारने झाली, सर्वाना पोट भरून नाष्टा व फळाहार देण्याची जबाबदारी राजा कडून जगप्रसिद्ध हास्य सम्राट श्री दीपक देशपांडे ह्यांनी होती. नंतर सुरु झाली मिरवणूक, मिरवणुकीत वाद्य वृंद व लेझीमची संगत होती, 100 Mtr चे अंतर कापायला अवघा दीड तास लागला, सर्वांच्या physical fitness चा कसं लागला होता. शाळा सोडल्या नंतर लेझीम खेळण्याचा माझा पहिलाच अनुभव.
नंतर सामुदाईक ओवाळणे झाले, पुषवृष्टी झाली, नंतर काही सत्कार झाले. सत्कार पुकारले की दोन cheer boys (पक्या भुजंग व सुश्या जवळेकर) ह्यांनी रंगत आणली. ह्या प्रमुख कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हास्यसम्राटनी केले.
नंतर हूरडा कार्यक्रम, मग रंगला क्रिकेटचा खेळ. क्रिकेट मध्ये केसकर चिरंजीव नीरज व देवस्थळी चिरंजीव केतननी पण भाग घेतला, खेळताना झालेल्या भांडणात पण दोघांनी हिरहिरीने भाग घेतला.
नंतर सर्व नवोदित गायक गायिकेनी गाणी ऐकवली, ह्याचे पूर्ण सूत्रसंचालन स्मिता शहानी केली, प्रत्येक गाण्याला oncemore मिळत होता पण वेळेअभावी स्मिता त्याकडे दुर्लक्ष करत होती, असो.
नंतर सुनीताच्या मुलीने आपले मनोगत व्यक्त करताना, आमची पिढी ह्या तून काही बोध घेईल हे पण आवर्जून सांगितले.
आत्ता पर्यंत सर्व g to g मध्ये फॅमिली members चा सहभाग नसायचा पण राजाच्या आग्रहामुळे ह्यावेळी फॅमिली members पण सहभागी होते, त्यामुळे कार्यक्रम जास्तच देखणा झाला, हे सांगणे न लगे.
नंतर उत्कृष्ट व रुचकर जेवण झाल्यावर कार्यक्रमाचा निरोप समारंभ होऊन, न भूतो अश्या कार्यक्रमाची सांगता झाली.
आता सर्व डोळे उद्याच्या Final क्रिकेट match कडे आहे. Shield कोणाकडे जाणार हा आता उत्सुकतेचा विषय.
पुढील कार्यक्रम 30 मार्चला रंगपंचमीचा.
जयंत केसकर
Comments
Post a Comment