@Wealth management at 60.


हा भाग सगळ्यात महत्वाचा, आपली पुंजी कुठे गुंतवावी व किती गुंतवावी ह्या बद्दल कायमच मनात गोंधळ असतो. मी particular कोणत्या product मध्ये पैसे गुंतवावेत, ह्याचा सल्ला देणार नाही पण किती व कुठे पैशाची गुंतवणूक करावी हे सांगणार आहे.


आपल्या पैशाची गुंतवणूक करताना, आपण 3 गोष्टींचा विचार करावा.

1. *आपण ठेवलेले पैसे व त्यावर मिळणारे पैसे सुरक्षित ठिकाणी आहेत का.*

2. *आपण ठेवलेले पैसे, जेंव्हा हवेत तेंव्हा सहज पणे, रोकड्यात रूपांतरित होतील का, व त्याचा काळ किती असेल.*

3. *आपण गुंतवलेला पैसा, किती काळासाठी गुंतवायचा व त्यावर मिळणारा परतावा किती, व तो कधी मिळेल.*


आपले पैसे ह्या तीनही बकेट मध्ये ठेवावेत. कुठे किती व कसे ठेवावेत हे आपण आता बघूत.

1. आपण जे पैसे ठेवतो, तेंव्हा पहिल्यांदा आपल्याला परतावा किती मिळेल, हे प्रथम पाहतो व जास्तीत जास्त पैसा त्या बकेट मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. मित्रानो मिळणारा परतावा व ठेवलेल्या पैशाची आपण जी रिस्क carry करतो, ही नेहमी व्यस्त प्रमाणात असते. ज्या योजने मध्ये ror (rate of returns) जास्त तेथे आपल्या capital ची रिस्क जास्त असते.

आपण जर गुंतवणूकीचा thumb rule बघितलात तर आपण, आपल्या जवळ असलेल्या रकमेच्या, आपल जेवढं वय आहे तेव्हढा भाग मिनिमम रिस्क व कमी ror असेल अश्या ठिकाणी ठेवावेत. म्हणजेच 60 वर्षाचे असताल तर 60% रक्कम ही अश्या product मध्ये गुंतवावी.

असे कोणते options आपल्या कडे available आहेत ते आता बघूत.

a) ज्या मोठ्या बँका आहेत, त्यांचे FD schemes मध्ये.

b) भारत सरकारने जी Senior citizen साठी 10 वर्षाची scheme.

3)सरकारने guarantee दिलेल्या, बॉण्ड मध्ये.

4) Indian post office च्या निरनिराळ्या योजना मध्ये.


अश्या ठिकाणी ठेवावेत. आपण बँकेत पैसे ठेवताना पण त्या बँकेतील ठेवीना, Deposit insurance cover उपलब्ध आहे की नाही, ह्याची खात्री करावी. एका बँकेत एका व्यक्तीच्या नावे जास्तीत जास्त Rs 5.00 लाखाची ठेव ठेवावी, कारण Deposit insurance cover तेवढेच मिळते. *पैसे ठेवताना, शक्यतो Jt अकाउंट काढुन ठेवावे. ते शक्य नसेल तर नॉमिनेशन जरूर करावे.*


भारत सरकारने, सिनियर citizen साठी एक, मुदत ठेव योजना चालु केली आहे. त्यात परतावा 8% आहे, मुदत 10 वर्षाची आहे. मध्येच ठेव मोडता येत नाही. ह्या योजनेत आपण जास्तीत जास्त रु 30 लाख ठेवू शकता. सरकार कडे पैसे जमा आहेत म्हणजे, गुंतवणूकीची रिस्क zero असते.


भारत सरकारने issue केलेले किंवा guarantee दिलेले बॉण्ड, हे पण खूप सुरक्षित असतात. पण ह्यात गुंतवणूक करताना एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन गुंतवणूक केलेली बरी. सरकारने issue केलेले अथवा सरकारने guarantee दिलेल्या बॉण्ड ची रिस्क 0 असते पण परतावा बँक deposit पेक्षा थोडा जास्त असतो, फक्त त्याची मुदत किती व मुदती पूर्व पैसे मिळण्याची सुविधा आहे का, हे बघून गुंतवणूक करावी.

Indian post च्या पण काही योजना आहेत, त्या पण safe असतात त्यात पण आपले पैसे सुरक्षित राहतात. तेंव्हा हा पर्याय पण आपण निवडवा.


तर वर नमुद केल्या प्रमाणे परतावा, मर्यादित, सहज रोकडं तरलता, व मुदत ह्या सर्वांचा विचार करुन, ठेवीचा निर्णय आपल्या आपण घ्यावा. तसेच मिळणारा परतावा म्हणजेच व्याज कधी मिळते हे पण बघणे आवश्यक असते. व्याज मासिक, त्रयमासिक, अर्ध वर्षीय वा वर्षातून एकदा असे विविध पर्याय उपलब्ध असतात. किंवा एकदम मुदती नंतर पण मिळण्याची सोय असते. आपल्याला हवे तसें हे पर्याय स्वीकारावेत.


आपण सेवानिवृत्ती नंतर शक्यतो दोन किंवा तीन SB खाती ठेवावीत. बाकी सर्व खाती बंद करावीत. ह्या खात्यामध्ये शक्यतो 3 महिने लागणारी खर्चाची सरासरी रक्कम ठेवावी.


एक महत्वाचे म्हणजे आपली व पत्नीची medical insurance policy काढुन ठेवावी. त्याचे कव्हर कमीत कमी 5 लाखाचे असावे. Medical expenses चा inflation rate हा सध्या 12% आहे, म्हणून हे अत्यावश्यक आहे. सेवानिवृत्ती नंतर शक्यतो, जीवन विम्या मध्ये रक्कम गुंतवू नये.


जी 40% रक्कम जास्त परतावा व जास्त रिस्क मध्ये गुंतवायची आहे, त्याबद्दल पुढील लेखात.


जयंत केसकर

AGM, BOI

Comments

  1. Very well explained to the point. It was much needed

    ReplyDelete
  2. Wise suggestions, very informative blog (y)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जलोटा

Tarrif युद्ध

Melbourne 1