@wealth management at 60
पुष्प 2
आज आपण जेंव्हा साठाव्या वर्षी सेवा निवृत्त होणाऱ्या व्यक्तीस भेटतो, तेंव्हा त्यांना जेष्ठ नागरिक का म्हणावं असा प्रश्न पडतो. पूर्वी आपल्या अगोदरच्या पिढीत सेवा निवृत्त व्यक्ती म्हणजे त्याच्या काही जास्त गरजा नसायच्या, फिरायची आवड नसायची. पण आता तसें राहिलेली नाही, सेवा निवृत्त व्यक्तीच्या इच्छा असतात, त्या ह्या पैशातून त्या इच्छा पूर्ण करायचे असते. सहचारिणीला पण काही मनातील राहिलेली खरेदी असते. तर हा खर्च किती करावा हे आपण ठरवावे.
वर नमुद केलेले, (मागच्या लेखात) खर्च अनुक्रमे 1 व 2 ही एक हौस असते, ते किती करावेत तेवढे कमीच असतात
*साधारण आपल्याला आलेल्या पुंजीतली 20 ते 30% रक्कम खर्च करावी, हा thumb rule आहे.* कारण राहिलेल्या 70- 80 % रकमेतून आपल्याला राहिलेले अंदाजे 20 ते 25 वर्ष आयुष्याचे सर्व खर्च भगवायचे आहेत. आपण उर्वरित आयुष्य हे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबीच असावे. बऱ्याच ठिकाणी काही सेवा निवृत्तीच्या वेळी Loan शिल्लक असतात. मध्यम वर्गीय लोकांनी हल्ली रिअल इस्टेट मध्ये राहत्या घराचे सोडून, loan घेऊन दुसरे घर किंवा प्लॉट्स मध्ये पैसे गुंतवल्याचे आढळते. असे काही assets असतील तर ते ह्या वयात monetise करुन, त्या पैसे आपल्या liquid इन्व्हेस्टमेंट मध्ये ठेवावेत. *कारण आता आपण बघतो की घराचे second सेल करणे खूप अवघड होत आहे. अजुन 10 वर्षांनी तर परिस्थिती अजुन अवघड होईल, सप्लाय खूप आहे पण डिमांड कमी होत आहे* . त्या मनाने त्याची holding कॉस्ट वाढत आहे. त्यामुळे माझ्या मते, हे जर आपल्या उपयोगाचे नसेल तर रेंटने देण्या पेक्षा, विकून टाकलेले व त्या पैशाचा उपयोग loan फेडण्यासाठी वापरावा.
मुलांचे शिक्षण पूर्ण करण्या साठी education loan घेऊन शिक्षण पूर्ण करावे असलेल्या loan ची परतफेड किंवा part lump sum भरणे, हे आपल्याला मिळणाऱ्या सेवानिवृत्ती वेतानावर अवलंबून आहे. त्याचा हप्ता आपण जर वेतन व अन्य मासिक उत्पन्नावर ठरवावे. कारण हल्ली बँका home loan चा हप्ता 70 व्या वर्षापर्यंत करता येते. तसेच वर नमुद केल्याप्रमाणे अनावश्यक properties, monetise करुन पण कर्ज परतफेड किंवा भार कमी करता येतो.
हल्ली मुलांचा पण बाहेर देशी जाण्याचा कल खूप आहे, त्या साठी खर्च पण खूप असतो, आपली पण आपल्या मुलांनी चांगल शिक्षण घ्यावे ही इच्छा असते, पण हा खर्च खूप असतो, तो भागवण्या साठी education loan चा पर्याय आता सहज उपलब्ध आहे, त्याची परतफेड पण हल्ली मुले लवकर व जबाबदारीने करतात असं एक survey सांगतो, आपण त्याच्या परतफेडीत शक्य झाले तर मदत करावी, त्याला अशक्य असलेले परतफेडीचे हप्त्याचा भार टाकू नये, आपण मुलाला सायकल किंवा पोहायला शिकवताना जसा आधार दिला तसाच त्याला करिअर पूर्ण करताना द्यावा.
पहिल्या लेखातील अनुक्रमांक 3 वर नमुद केलेला मुद्दा पण खूप महत्वाचा आहे.
आपल्याला मिळालेली पुंजी, जेव्हढी आहे ती जपून ठेवावी. शक्यतो वृद्धी होईल असे बघावे पण कमी होणार नाही ह्याची ठराविक interval नंतर खात्री करत राहावी.
साधारण average आयुष्य 80 वर्ष आहे, आपली पत्नी जर 5 वर्षांनी लहान असेल तर हा पैसा 25 वर्षे कसा राखायचा ते बघावे.
येणाऱ्या inflation व असलेल्या पैश्यातून उर्वरित आयुष्य कसे घालवावे, हे पुढील लेखात
जयंत केसकर
Comments
Post a Comment