@wealth management at 60
मी आज पासून, ही लेखमाला लिहायला सुरुवात करत आहे. आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी पहिले पुष्प गुंफताना खूप आनंद होत आहे. *आपली wealth अक्षय राहो हीच आजच्या दिवशी प्रार्थना.*
साठाव वर्ष हे निवृत्तीचं वर्ष. सेवानिवृत्तीच वर्ष. ह्या वर्षी सेवा निवृत्ती पश्चात मिळणारे सर्व पैसे एकत्र मिळतात. आयष्यभर कमाई करुन मिळवलेली पुंजी असते ती. मग आपले सर्व नातेवाईक, त्याचा विनियोग अथवा गुंतवणूक कशी करायची ह्या बद्दल सल्ला देऊ लागतात. जास्त परतावा असलेल्या स्कीम, तीन वर्षात पैसे दामदुप्पट करुन देणारे आपल्या आसपास येऊ लागतात. पैसे मिळाल्यावर *पहिले तत्व ठेवायचे ते capital protection.*
*Capital Protection.*
सेवानिवृत्ती नंतर काही लोकांना काही ठराविक रक्कम मिळते व निवृत्ती वेतन चालु होते तर काही जणांना केवळ बक्कळ रक्कम मिळते. ज्या लोकांना बक्कळ रक्कम मिळते त्यांना उर्वरित आयुष्यात दररोजचा खर्च आपला व पत्नीचा ह्याच रक्कम गुंतवणूकितील परताव्यातून करावा लागतो. म्हणुन आलेली रक्कम खूप विचार करुन गुंतवावी लागते.
वर नमुद केल्या प्रमाणे आपले पैसे एकत्र मिळाले की त्याला खूप वाटा फुटायला लागतात. मध्यम वर्गीय घरात लिमिटेड income असतो, त्यामुळे एव्हढी मोठी रक्कम प्रथमच पाहिलेली असते त्या मुळे, काही राहिलेल्या खरेदी, मोठे खर्च करावेत ही साहजिकच इच्छा असते.
मिळालेला 1 रुपयात, कसा खर्च करावा, ह्याचे काय पर्याय आहेत ते आपण प्रथम बघूत
1 आयुष्यात इच्छा असलेले, पण निधी अभावी राहिलेले खर्च.
2 मुला-मुलींचे लग्न
3 घेतलेल्या कर्जाची परतफेड.
4 गुंतवणूक
वरील नमुद केलेले पहिले 3 पर्यायामधून आपले, capital protection होत नाही. जो चवथा पर्याय capital protection साठी उपलब्ध असतो. पहिले तीन पर्यायात विनियोग केलेला पैसा आपल्याला परत येत नाही. Capital protection म्हणजे, जी पुंजी मिळाली ती आपल्या उर्वरित आयुष्य भर आपले, सेवा निवृत्ती वेतन व capital गुंतवणूक उर्वरित आयुष्यातील खर्च कसे भगवायचे त्या साठी लागणारी अंदाजे पुंजीचे संरक्षण कसे करायचे त्याचे नियोजन कसे करायचे, ते खूप आवश्यक व ट्रिकी असते.
क्रमशः
जयंत केसकर
धन्यवाद! छान सुरुवात!
ReplyDelete