24 तारखेला मुंबईला जाण्यास सकाळी निघालो, नीरज व मुग्धाला पण आजाराचा सिरीयसनेस लक्षात आला होता, मला नीरज, मुग्धा व स्मिताची खूप काळजी वाटू लागली होती, आपण नसताना ह्यांचे कसे होईल असे वाटत होते. त्या तीघांना माझी काळजी वाटत होती, सकाळी सगळे मुंबईला गेलो, बरोबर 1.15 मिनिटांनी सोमय्याला पोहोचलो. बरोबर 2 वाजता Dr चा 10 मिनिटात येतो म्हणून फोन आला. 10 मिनिट चर्चा केली. सगळं ऐकून CD बघितल्या वर चर्चा करुत म्हणाले.
CD घेऊन तेथील cathlab मध्ये गेले, 5 मिनिटात वर बोलावलं, परत सरांनी सर्व explain केले व TMT करायचा सल्ला दिला, मी पायात रॉड असल्यामुळे TMT करता येत नसल्याचे सांगितलं, मग DSE test करायला सांगितली व ती पण ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथेच. माझा भाऊ नितीन ह्याने सर्व किती सिरीयस आहे व urgent आहे असे विचारलं, बद्दल काही बोलले नाहीत पण urgent नाही हे आवर्जून सांगितले, ज्युपिटर हॉस्पिटलची 29/12 तारखेला 12.40 वाजताची अपॉइंटमेंट मिळाली. ठरवल्या प्रमाणे तिथे गेलो, बरोबर 12.40 ला आत बोलावले, ही test काय असते ते प्रथम तेथील एका जुनिअर dr ने सांगितलं. Dobutomine stress echo test ही ज्या patientna TMT करणे शक्य नसते त्यांना निदान करणे शक्य होण्यासाठी करतात. त्यात Dobotomine नावाचे औषध veins मधून inject करुन, हळू हळू heart stimulate करतात व ECG मधील changes, BP variations note केली जातात, साधारण सर्व व्हायला 2.15 वाजले, test पॉसिटीव्ह आहे पण report Dr पागदना दाखवून निर्णय घ्या असे सांगितले. पागद सरांना report पाठवले व रिस्पॉन्सची वाट बघत राहिलो.
( DSE बद्दल एवढ्या विस्ताराने लिहिण्याच कारण म्हणजे layman ना ह्याची कल्पना असावी, मला ही test इतर कोणीच recommend केली नव्हती).
Dr पागद सरांनी 3 तारखेला call केला व blockages significant आहेत व procedure करावी लागेल असे सांगितले. फोन ठेवता ठेवता Earlier is better हे आवर्जून सांगितले. तारीख ठरवून सांगा म्हणाले. नीरज 6 तारखेला परत जाणार होता. मी पण office पासून साधारण 1 महिना झाला दूर होता, आठवडाभर परत join व्हायचे ठरवले व 23 च्या आठवड्यात procedure करावी असे कळवले. सोलापूरला गेल्यावर परत एक दोन dr ना काही कारणा साठी भेट झाली, त्यांनी सर्व reports बघितले, plasty ने काहीच उपयोग होणार नाही, lower veins पूर्ण defused आहेत, अजून कोणत्या तरी cardiac सर्जन ला दाखवून सल्ला घ्यावा, angioplasty म्हणजे फक्त biased advise आहे व एक दोन वर्ष पण त्याचा उपयोग होणार नाही असे सांगितलं, नाहीतर physical movements पूर्ण बंद करुन medication वर आयुष्य पुढे जावे असा सल्ला दिला, परत रात्र भर झोप लागली नाही, आपल्या आयुष्याची कोणी खात्री देत नाही ही भावना खूप त्रास दायक होत होती. सकाळी Dr मुकुंदला call करुन घरी येण्यास विनंती केली. Dr पागदना procedure नंतरच life कसे असेल असा विचारणारी पोस्ट पाठवली. 1 दिवस त्यांनी काहीच reply केला नाही, दुसरे दिवशी मला सांगितले, before the procedure i will answer all your queries. त्यांनी 23 तारखेला procedure करुत, म्हणून कळवले, 23 तारीख बघितल्यावर परत भीती वाटली, कारण 23/01/13 ला दादा गेले होते, सरांना call केला व अगोदर करायची विनंती केली, अखेर चर्चे अंती 18/01 ला ग्लोबल हॉस्पिटलला करायचे ठरले. बोलताना defused veins activate करण्या साठी त्यांनी काही procedure प्लॅन केल्याचे सांगितले व ग्लोबल ला best infrastructure असलेली कॅथ लॅब असल्याचे पण सांगितले.
विनंती केल्याप्रमाणे Dr मुकुंद सकाळी आला, परत चर्चा, मुकुंदा म्हणाला सोलापुरातील दुसऱ्या एका cardiologist ना दाखव त्यांचा सल्ला घे, त्या प्रमाणे कर, त्यांना दाखवलं, त्यांनी परत सगळ्या test केल्या, नंतर right आर्टरीला blockage आहे तिथे stenting करुत म्हणून सल्ला दिला, मुंबईला जाण्याची गरज नाही असे पण सांगितले, पण Dr पागद ह्यांनी जेव्हढं डिटेलिंग केल होत, त्या वरुन तिथेच procedure करावी असं वाटत होत. संध्याकाळी पश्या, मोहन आले त्यांनी पण हेच सांगितले. स्मिता व नीरज पण त्याच conclusion वर आले होते. सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन सोमवारी सकाळी पुण्यात आलो. पुण्यात मुक्काम केला व सकाळी मुंबईला जायची तयारी सुरु केली. दुपारी 1 वाजता महाराजांचे स्मरण करून मुंबई कडे जायला निघालो. Ola ने गेलो. Admission, कॅशलेस ह्याची सर्व व्यवस्था हॉस्पिटल मधील, staff मुळे पोहोचण्या पूर्वीच झाली होती.
साधारण 4.30 वाजता हॉस्पिटलला पोहोचलो, गेल्यावर हॉस्पिटल प्रथे प्रमाणे Dr पागदना call केला, मी पण बोललो, बुधवारी दुपारी 2 वाजता procedure करायची असे सांगितले. आम्ही रुमवर गेलो, रश्मी लगेचच आली, थोडी विश्रांती घेई पर्यंत, Dr पागद स्वतः रूमवर आले. आल्यावर तपासले, सर्व reports परत पाहिले व परत सर्व काही विचारले, शांत पणे ऐकत होते.
सगळं ऐकल्यावर त्यांनी procedure करताना प्लॅन A व प्लॅन B तयार असल्याचे सांगितले. You trust me, nothing will happen to you हा विश्वास दिला, procedure नंतर तु मॅरेथॉन सोडून सगळं करू शकशील हा कॉन्फिडन्स दिला, व सकाळी दीड वाजता तयार रहा असे सांगून गेले. सर्वात विशेष म्हणजे डॉ senior असून, आले तेंव्हा कोणी लवाजमा बरोबर नव्हता, सर्व reports स्वतः पाहिले, मला अर्धा तास दिला, सगळं समजावून सांगितले, उद्या मी स्वतः procedure पूर्वी 2 D करुन ठरवेन असे सांगितले. हे सगळे confidence वाढवणार होत.
दुसरे दिवशी सकाळी सर्व तयारी केली. Procedure वेळी नितीन, जयंत, मिलिंद मामा, रश्मी, मोहन डांगरे सर्व आले होते. Cathlab मध्ये जाताना failure ची 1% पण शंका नव्हती. Cathlab वर बरोबर 2.30 वाजता नेले व procedure 3 वाजता चालु केली. 5.15 वाजता Dr नी procedure पूर्ण झाल्याचे व successfull झाल्याचे जाहीर केले. वरील नमुद केलेल्या सर्वांना 15 मिनिटात सर्व explain केले, procedure पूर्ण झाल्यावर मोहन थोडा वेळ भेटून लगेचच सोलापूरला गेला, नितीन, जयंत, मिलिंद मामा, रश्मी दिवस भराच्या stress release झाल्यावर घरी गेले असे नंतर स्मिताने सांगितलं . नीरजला सरांनी over telephone all well चा निरोप सांगितला, व मला i brought you on track, now it is upto you how to take it forward हा महत्व पूर्ण msg दिला
जयंता,
ReplyDeleteहॉस्पिटल हे स्वर्गाचे दार असते असं म्हणतात. तू स्वर्गाच्या दारापर्यंत जाऊन परत आलास ही भाग्याची गोष्ट आहे. त्याबद्दल तुझे पुनश्च अभिनंदन.💐
तू जे प्रांजळपणे लिहिलेस त्याबद्दलही तुझे अभिनंदन. 💐
तुला साथ देणार्या स्मितावहिनींचेही हार्दिक अभिनंदन. 💐
आता जास्त दगदग आणि काळजी करु नकोस. जास्ती विचारही करु नकोस. गोंदवलेकर महाराजांवर सर्व सोपव व निर्धास्त राहा. निरजची काळजी सूनबाई घेतीलच. Your retirement is on the verge. So enjoy the life after retirement blissfully.