हृदय रोग आणि मी


मला पहिला हार्ट attack आला, तो अगदीच अनपेक्षित पणे, म्हणजे झालं  असं, चारचा सुमार होता, प्रचंड

 उकडत होते, जांभळे खात गॅलरीत उभा होतो, अचानक घश्यात काहीतरी अडकल्या सारखं झालं, दरदरुन घाम आला, आत बेडरूम मध्ये गेलो, ac चालु केला व जरा पडलो, काही कमी होईना, तडक कपडे घातले, मनात संशयाची पाल चुकचुकली, स्मिताला सांगितलं व तडक नजीकच्या hospital मध्ये गेलो, Bp 180/110 होता. हार्ट बीट्स वाढले होते.डॉ नी 2 D केली व हार्ट अटॅक होता हे जाहीर केलं. नीरज व स्मिता खूप घाबरले होते, पण मला जास्त भीती वाटत नव्हती, कारण 2006 ला माझे boss श्री व्होरा ह्यांना असाच त्रास झाला होता, व hotel centaur पासून पनवेल पर्यंत rescue केलं होते, तेंव्हा त्या दोन तासात होणारे सर्व changes मी पाहिले होते, पण त्यामुळे मी ताबडतोब हा हार्ट अटॅक आहे व लगेच medical help घ्यावी, हे डोक्यात बसले होते. असो.


नंतर 8 दिवसांनी angioplasty MGM वाशीला झाली व नंतर 8-9 वर्ष खाण्याची सर्व पथ्यं बारकाईने पाळत होतो. मनात एकहोते; परत असे घडायला नको. रेग्युलर lipid प्रोफाइल करून, वाईट cholesterol वाढणार नाही ह्याची काळजी घेत होतो.


आपण ठरवतो ; पण घडणारं घडतंच, त्याच असं झालं.

एकदिवस सकाळी सोलापूरला गच्चीवर मी व स्मिता फिरायला गेलो. साधारण 10 मिनिटे झाली, मान दुखायला लागली, दुर्लक्ष केलं, नंतर दोनच मिनिटात घशात काहीतरी अडकल्या सारखं झालं. मनात शंका आली. परत दहा मिनिटे फिरलो व routine ला लागलो. त्यानंतर दोन तीन दिवसांनी hotel धनश्री पर्यंत गेलो. परत येताना तोच त्रास.खाली दहा मिनिटे बसलो व नंतर वर घरात आलो. परत काळजी वाटायला लागली. नीरजच्या लग्नाला 1 महिना पण राहिला नव्हता. घरी येऊन bp चेक केलं 130/82. विसरलो, पण आता झालं तर atleast spondolysis तर नाही ना,  हे मुकुंदा कडून कन्फर्म करायचे ठरवले. परत 29 नोव्हेंबरला घरापासून बाळगंधर्व पर्यंत फिरायला गेलो. येताना Dr. रायना फोन केला, तो म्हणाला ,'सोलापुरात आलास की ये, आपण बघूत. त्याच दिवशी दुपारी त्याच्या कडे गेलो, त्यानं हात पाय खालीवर करायला लावले. X ray ककाढल.  त्यापूर्वीच, cardiologist ला दाखवायला सांगितलं. लगेच गेलो. मला त्यांनी TMT करायला सांगितली. मी करू शकत नाही म्हणल्यावर 2D echo केली व angina symptoms म्हणून ताबडतोब angiography करायला सांगितलं, लग्न फक्त 12 दिवसावर आले होते. ऐनंतर करावे म्हणून ठरवले पण तो पर्यंत 8 Dec ला घरात सगळ्यांना व बाहेर काही जवळच्या मित्रांना कळाले व 8 dec ला test करायची ठरली.

8 Dec 2022, सकाळी 8 वाजता मार्केडेय हॉस्पिटल, सोलापूरला admit झालो, सकाळी पहिल्यांदा सर्व तयारी झाली, 12 वाजता कॅथ लॅब मध्ये घेऊन गेले.


12.10 ला साधारण ग्राफी झाली, डॉक्टर cd बघण्यासाठी बाहेर गेले. 10 मिनिटात assistantla plasty करायची नाही, असा आदेश आला व मला बाहेर बोलावले, माझ्या बरोबर माझी बायको व मुलगा ह्यांना पण बोलावले. मला plasty नाही म्हणजे मनात बरे वाटत होते, पण ते समाधान क्षणासाठी होते. आम्ही आल्यावर dr नी cd प्ले केली.technically काही गोष्टी सांगितल्या. डाव्या बाजूला खालच्या veins  defused आहेत व पूर्वीच्या स्टेन्ट खाली पुन्हा blockage आहे. आपण plasty करू शकत नाही व unstable anjiana असं निदान केल. पायाखालची जमीन सरकली. कॉल येऊ लागले. plasty नाही म्हणून सर्वांनी समाधान व्यक्त केले. खरं काय ते कोणाला सांगू शकत नव्हतो. Dr. नी पुण्यालाDr.  हिरेमठना दाखवायला सांगितलं.  लगेच दाखवून निर्णय घ्यावा. असे पण सांगितले. खूप हादरलो होतो. लग्न 10 दिवसांवर आले होते. 12 पासून सोडमुंज, देव ब्राह्मण करायचे होते, काहींनी लग्न पुढ ढकलावे अशी पण सूचना केली, कुणी हृदय रोग किती किरकोळ आहे म्हणून काउन्सिलिंग केले, कोणी हृदय रोगावरची पुस्तकं वाच, सगळं कमी होईल असा पण सल्ला दिला. मी मात्र चोरून unstable angina व त्याचे परिणाम, ह्यावर google वर वाचत होतो व हादरून जात होतो. मोहन, प्रशांत, मुकुंदा त्यांच्या परीने काही होणार नाही अशी समजूत घालत होते. 9 तारखेला डिस्चार्ज घेऊन, घरी आलो माझ्या मामाला, मिलिंद मामाला कॉल केला, तो म्हणाला लग्न होऊन मुंबईत ये . आपण Dr समीर पागद ना दाखवूत, ते मार्ग काढतील.


10 तारखेला पुण्यात येण्या साठी निघालो. सर्व काही विसरायचं ठरवलं. आनंदात सर्व करू लागलो, सगळी खरेदी व्यवस्थित झाली. तयारी छान झाली पण रात्री झोपल्या वर भीती डोकं काढायची. काही दुखलं की heart attack आला की काय, अशी शंका यायची. जोरजोरात रडावसे वाटायचे. सकाळी उठलं की परत उत्साह वाढायचा. असं करत करत 16 तारीख उजाडली. आम्ही 16 ला म्हणजे एक दिवस अगोदर औरंगाबादला जायचे ठरवले, ठरवल्या प्रमाणे 16 ला संध्याकाळी हॉटेलवर पोहोचलो. गेल्यावर परत लग्नाचा उत्साह आला. 17 तारखेला दिवसभर विश्रांती घेतली. संध्याकाळी 4.30 वाजता आवरून पाहुण्यांच स्वागत करायला बाहेर गेलो. एक एक जण येत गेले, हास्य विनोद चालू झाले, सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडले. बायको स्मिता पण हसतमुखाने सर्व कार्यक्रमात भाग घेत होती, पण नजर माझ्या मागे फिरत होती. मधून पाणी प्यायला लावत होती, पोरांबरोबर सर्व कार्यक्रम झाल्यावर मी नाचायला पण गेलो. तिने लगेच मला भानावर आणले.

सगळी औषधं बरोबर घेतल्याची स्मिताने खात्री केली व रात्री एक वाजता झोपलो.


सकाळी परत 5 वाजता उठलो, परत उत्साह संचारला, दिवस भराभर पुढे सरकत होता.सर्वांशी हसत खेळत बोलत होतो नवनवीन कपडे घालत होतो. वरातीत पण गेलो, सर्व बारातीनं बरोबर नाचलो, अक्षतेला जाताना कोण आला रे कोण आला, केसकरांचा वाघ आला अश्या घोषणा दिल्या. अक्षता सुखरूप पार पडल्या, मग डोळे खूप भरुन आले. ह दे 1978 मित्रांकडे गेलो. डोळ्यातून पाणी वाहून दिले व परत समारंभात सहभागी झालो.


पुण्यात निघताना कोणाची तरी गाडी  आपल्यागाडी बरोबर असावी असे वाटत होते पण सगळे पुढे निघून गेले होते. सव्वा सहा वाजता निघालो. थोडी भीती वाटत होती. पुन्हा विचार चालू झाले, काळजी, भीती  भरून राहिली. एकटं वाटायला लागलं, दुसऱ्या दिवशी सत्य नारायण होता व 22 तारखेला reception, दोन्ही कार्यक्रम व्यवस्थित पार पडावेत अशी देवाला प्रार्थना करत होतो.


लग्नादिवशी रात्री 12.15 वाजता घरी सुखरूप पोहोचलो, गृह प्रवेश व्यवस्था स्मिताने व्यवस्थित केली होती, ती पण हसतमुखाने सर्व करत होती पण माझ्या तब्येतीची काळजी तिच्या चेह-यावर मला दिसत होती, दुसरे दिवशी सत्यनारायण पूजा व्यवस्थित पार पडली. 20 तारखेला सकाळी सोलापूरला गेलो, जाताना गोंदवले, म्हसवड, भाळवणी, पंढरपूर दर्शन करून रात्री सोलापूरला घरी पोहोचलो, दुसऱ्या दिवशी reception चा सर्व आढावा घेतला. 22 तारखेला reception व्यवस्थित पार पडले, बोलावलेले सर्व आप्त आले होते, रात्री 9.30 नंतर डावा हात दुखू लागला, मग घरी न जाता रात्री सरोवरला थांबलो, दुपारी 12 नंतर निघून पुण्यात आलो, 24 तारखेला दुपारी दोन वाजताची Dr. समीर पागद सरांची अपॉइंटमेंट, सोमय्या हॉस्पिटलची मिळाली होती, त्या प्रमाणे सगळे सकाळी जायचं ठरलं होत.


क्रमश:

Comments

  1. छान!
    पुढील कथनाची वाट बघत आहे!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जलोटा

Tarrif युद्ध

Melbourne 1