मुकुंद राय
मुकुंदा/मुक्या/मुकिंदा/Dr राय
*जीवेत शरदः शतम*
शष्ट्यब्द्यपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा.
आज तू साठ पूर्ण करून, एकसष्टव्या वर्षात पदार्पण करत आहेस. तुला हे खरं वाटल नसेल, पण खरे आहे. तुला उर्वरित आयुष्य, खूप सुख, समृद्धी, आनंद व चांगल्या आरोग्याचे जावो हीच प्रार्थना.
मुकुंदा ला मी पहिली पासून ओळखतो. मुकुंदा नेने चाळ, दौंड इथे मुरलीधर मंदिराच्या अगदी समोर राहायचा, त्यांच्या घराचा दरवाजा उघडला की समोर मंदिर होते. ह्या आपल्या मित्राने 5 वर्षांपूर्वी ह्या देवळाचा जीर्णोद्धार केला. 1971ला ह्यांनी दौंड सोडले असावे, सुमारे 45 वर्षानंतर जीर्णोद्धार केला, धन्य आहेस मित्रा.
ही चार भावंड, आपला मुक्या तीन नंबरचा. 1 व 3 खूप अबोल, पण 2 व 4 खूप गप्पीष्ट लहानपणापासूनच. चौघेही खूप हुशार. मुक्याला लहानपणापासून व्यायामाची खूप आवड, डबल बार लहानपणा पासून करायचा.
त्यांनी दौंड सोडले दुसरी झाल्यावर, नंतर आमच्या भेटी कमी झाल्या. नववीला मी सोलापूरला आलो, नंतर जास्त संबंध नाही आले, त्याने अभ्यासात खूप प्रगती केली होती आणि मी जेमतेमच होतो.
त्याला दहावीला 80% मार्क्स , बारावीला pcb 89% मार्क्स मिळाले होते , नंतर तो मेडिकलला गेला, भेटी कमी होत गेल्या. पण येता जाता हात करुन जात असे.
पण आताचा डॉ राय, खूप बोलका, social, रुग्ण सेवा हीच देव पूजा, फिटनेस (स्वतःचा व मित्रांचा) सांभाळणारा, खेळप्रेमी, आई दादांची सेवा करणारा, कुटुंबवत्सल, धन्वंतरी, energetic, निगर्वी, गायक असा आहे.
कोणाला कसलीही वैद्यकीय मदत लागू दे, हा easily accessible असतो. माझ्या तीनही दुखण्यात मला ह्याची खूप मदत केली.
ह्याच्या कडे येणारे काही patients, खूप गरीब पण असतात, हा त्यांना औषधं उपचार तर फुकट करतोच पण परत जायचे गाडी खर्च पण स्वतः करतो.
सोलापुरात त्याच्या बद्दल त्याच्या क्षेत्रात खूप आदराने संबोधतात हे मी अनुभवले आहे.
अश्या ह्या सुप्रसिद्ध डॉ ला रुग्णसेवा करायची अजून खूप वर्ष संधी मिळूदे, अजून 40 वर्षांनी त्याच्या बद्दल असाच blogg लिहायची संधी मला मिळो हीच प्रार्थना.
तुझाच मित्र
जबा
(हे नाव विसरला असशील म्हणून आठवण करून दिली )
छान सुरू केलय्. छान लिहितो आहेस. 👍👍
ReplyDelete