ह दे तील मित्र
विठ्ठल/बापू
*जीवेत शरदः शतम*
डावखुरा/अजात शत्रुत्वाचा वसा घेतलेला/अध्यात्म-ज्योतिष चा गाढा अभ्यासक/ रेकी मास्टर/ हळू आवाजात बोलणारा/ मिश्किल स्वभावाचा/ official फोटोग्राफर/ फास्ट vehicle drive करणारा/मराठी भाषेचा गाढा अभ्यासक/निवृत्त इलेक्ट्रिकल अभियंता असा हा बहूगुणी बापू उर्फ विठ्ठल कुलकर्णी. त्याचा आज शष्ट्यब्द्य पूर्तीचा दिवस, त्याला ह्या दिवसाच्या अनंत शुभेच्छा.
आज आपला मित्र सिनियर सिटीझन group मध्ये प्रवेश करत आहे.
वर नमूद केलेला ज्योतिष पंडित व रेखी मास्टर ह्या दोन्ही गुणांमुळे मित्रांचे शारीरिक व मानसिक दुखण्या वरची मलमपट्टी सतत सोबत घेऊन हिंडत असतो. न चुकता सर्व मित्रांचे वाढदिवस साजरे करणे, मेष राशीचा असून टिकेवर तिखट भाषा वापरणे टाळतो. सगळ्या ट्रिप आयोजित करणे, नियोजनच implementation करणे, ह्यात ह्याचा हाताखंडा.
मला शाळेतला बापू आठवतो तो म्हणजे मिकुचा मित्र. हसतमुख, अभ्यासू, हुशार आणि स्वातीच्या व्याख्ये प्रमाणे A तुकडीत होता म्हणुन स्मार्ट मुलगा होता. अजात शत्रूत्वाचा वसा तर त्याने शाळे पासूनच घेतला असावा. अभियांत्रिकीचे शिक्षण कऱ्हाड मधून घेऊन MSEB मध्ये प्रथम म्हसवडला नोकरी मिळवली असे समजले.
अश्या ह्या आमच्या बापूला हदेच्या मैदानावर एक वर्षा पूर्वी पासूनच पोर *आजोबा* म्हणून हाक मारायची. पण आज त्याचा सिनियर सिटीझन क्लब मध्ये official प्रवेश होत आहे.
बापू सध्या गीतेचे हस्तलिखित लिहीत आहे, व ज्ञानेश्वरी पुर्ण लिहिली आहे, दरवर्षी स्वतःचा दिवाळी अंक प्रकाशित करुन होतकरू कवी व लेखकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देतो सगळ्या तीर्थक्षेत्राना भेटी देतो. निरनिराळे चष्मे जमा करणे, ह्याचा पण एक छंद आहे. तसेच मागच्या गणेश चतुर्थीला tv वर अवतारला होता. 11 तारखेच्या लेखाची सुरुवात आता करायची आहे, म्हणून पूर्ण विराम घेतो आता.
अश्या ह्या सर्व गुण संपन्न बापू उर्फ विठ्ठलला माझ्या खूप खूप शुभेच्छा.
व्वा... यथोचित वर्णन!
ReplyDeleteअप्पू, तुम लिखते रहो
ReplyDeleteहम पढते रहेंगे