BOI स्मरणीय मित्र
मला Boi मध्ये भेटलेली स्मरणीय मित्र
भाग 1
माझे पहिले पोस्टिंग कुर्डुवाडी
02/05/1984
मी bank जॉईन केल्याचा पहिला दिवस. कुर्डुवाडी इथे मी जॉईन झालो तेंव्हा सर्व जण मला वयाने साधारण चार पाच वर्षांनी मोठे होते. माझी पहिली नोकरी असल्याने मी गेल्यावर माझ्या त्या वेळच्या स्वभानुसार खूपच बुजलेलो होतो. सहा पर्यंत काम केले, आणलेली शबनम बघ गळ्यात अडकवून आता रात्री मुक्काम कुठे करायचा विचार करत होतो, तेवढ्यात मागून आवाज आला, काय विचार करत आहेस, चल माझ्या रूम वर, बिराप्पा येडवे, मला मदत केलेला पहिला साथीदार BOI मधील. आम्ही दोघे गेलो साधारण 100 Sq feet ची खोली होती, त्यातच पूर्वी ज्याला न्हाणी म्हणायचे ती होती. तिथून माझा प्रवास चालु झाला. बिराप्पा येडवे आणि मी साधारण 18 महिने एकच रूम मध्ये राहिलो, बिराप्पा खुप गरीब कुटुंबातून आलेला. खुप इमोशनल पणं मदतीचा हात नेहमीच पुढे असायचा. त्याने पहिल्यांदा एकदम stud नावाची बिअर घरी आणली, मी जेंव्हा प्रथम पाहिली मला खुप घाम फुटला. कारण माझा स्वभाव (त्या वेळचा 😀). झोपताना मला म्हणाला तु पितोस का, मी नजर चुकवून नाही म्हणालो, त्यानं चहाचा कप काढला, घटा घटा प्यायला आणि झोपला. मी दौंडला दारू पिऊन लोक रस्त्यावर पडायची, व भांडण करायचे हे बघितले होते, रात्री खुप भीती वाटत होती, हा काय करतो म्हणून, सकाळी उठलो मी रात्री नीट झोपलो नव्हतो हे त्यानं ओळखलं, मला म्हणाला बिअर चढत नसती. नंतर अंघोळ करायला गेला, अर्धी अंघोळ झाल्यावर ओरडला मला, मला ओरडला ती बाटली दे, मी थरथरत्या हाताने बाटली उचलली, ती बाटली किती जड होती, उचलता उचलत नव्हती, कशिबशी त्याला दिली व बघत राहिलो हा काय करतोय ते, पाहिलं तर त्यानं थोडी स्वतःच्या डोक्यावर ओतली व डोकं धुतलं, मला म्हणाला हे कंडिशनर असते, केस मऊ होतात, हा मी त्याच्या कडून घेतलेला पहिला धडा.
त्याची ही दुसरी नोकरी, tyan ऑफिस मधे कस वागायचं, साहेबांशी कस बोलायचं, खुप धडे दिले, बुजरे पणा कमी होण्यासाठी खुप मदत केली. स्पष्ट बोलायचं हा त्यानं दिलेला एक पहिला मुलमंत्र.
कुर्डुवाडीत येडवे गेल्यावर अजुन एक अवलिया मित्र भेटला ते पुढील लेखात.
क्रमशः
मजा येतेय वाचायला! 😀लिहीत रहा आणि पाठवीत राहा.
ReplyDeleteLovely 👍 looking forward for more of your blogs Baba👍
ReplyDeleteभाऊजी,मस्त लिहिलंय. तुमचा गुण माहीत नव्हता. आणखी वाचायला आवडेल
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete