Boi भाग 2
मुकुंद वैद्य
येडवे 31/12/1985 ला उमदी इथे बदली होऊन गेला. त्याची जागा *मुकुंद वैद्य* ने घेतली. माझा समवयस्क होता. तो आल्यावर मी तो व सिद्धापूर, एकत्र राहायला लागलो. एका रूम मधून आमची शिफ्टिंग दोन खोल्या असलेल्या घरात झाली. वैद्य चांगला स्वयंपाक करायचा, मग आम्ही घरी स्वयंपाक करायला लागलो, पंपाचा स्टोव्ह काढून गॅस स्टोव्ह आले. तो स्वयंपाक करत असे, माझं व सिद्धापूरचे काम भांडी घासायचे असायचे. सकाळी उठलं की पाणी, भांडी दोनदा चहा व जेवण करून धावत पळत (मी बरका, कारण दोघांचे चालणे फास्ट होते) जायचो. घरी आल्यावर वैद्य सिगारेट ओढत ओढत CAIIB करण किती आवश्यक आहे ते मला समजावून सांगायचं.
वैद्य व मी साधारण 3 वर्ष एकत्र राहिलो, तो तसा खुप घाबरट होता, कुर्डुवाडीला एकटा शक्यतो राहायचा नाही. शनिवारी बहुतेक वेळा माझ्या घरी सोलापूरला यायचा, त्यामुळे घरगुती संबंध पणं वाढत गेले. माझा भाच्चा कौस्तुभचा पणं तो वैद्य मामा झाला.
7 जुलै 1987, बँकेत staff home लोन चे परिपत्रक आले, आपण पणं आपले घर घ्यावे म्हणुन माझ्या डोक्यात आले, मग घर बघायला सुरुवात केली, माझ्या बरोबर वैद्य असायचा, तेंव्हा पर्यंत मला भाजी, गहु तांदूळ सोडुन काही विकत घ्यायचे कळत नव्हते, थोडक्यात मला व्यवहार कळत नव्हता असे माझ्या घरातील सगळ्यांचे पणं मत होते, तेंव्हा वैद्य माझ्या बरोबर घर बघायला यायचा, तो बहुधा माझ्या पेक्षा जास्त matured दिसत असावा, कारण त्याच्या मुळे मला atleast बिल्डर ऑफिस मध्ये घ्यायचे.
आमचे पहिले विकत घेतलेले घर यशोधन मधले, माझे मेव्हणे निमकर ह्यांनी पसंत केले होते, मी जेंव्हा पहिल्यांदा घर बघायला गेलो तेंव्हा वैद्य माझ्या बरोबर होता.
कुर्डुवाडीहुन बदली झाल्यावर पणं त्याचे संबंध तसेच राहिले, माझे लग्न ठरल्या वर पणं पहिल्यांदा स्मिता कडे जाताना तोच बरोबर होता, लग्नाच्या वेळी पाच दिवस मुक्काम होता आमच्या कडे.
नंतर मी व तो ऑफिसर झालो ते पणं बरोबरच. त्याचा सहवास मला त्याच्या मृत्यू पर्यन्त लाभला. माझी सगळी काही सुख दुःख त्यालाच माहिती होती.
मला heart अटॅक आल्यावर, सोलापुराहून मुंबईला तिसरे दिवशी आला होता, angio plasty कुठे करायची कधी करायची ह्या सर्व चर्चेत स्मिता समवेत डॉक्टर कडे तोच गेला होता. अतिशय संवेदनशील, patience असलेला माझा मित्र, जाताना मात्र अचानक गेला. त्याचा मृत्यू खुप चटका लावून गेला.
वैद्य बरोबर कुर्डुवाडीत भेटलेले इतर मित्र सिद्धापूर, पत्की, प्रदीप कांबळे, विकास मोकाशी पणं कायमचे आप्त झाले.
क्रमशः
अरेरे अचानक Exit घेतली मित्राने? 😒
ReplyDelete