BOI भेटलेले स्मरणीय मित्र
भाग 4
प्रकाश कद्रेकर
07/02/1989 हा दिवस मी अक्कलकोट शाखेत जॉईन झालो. पावणे पाच वर्ष कुर्डुवाडीत राहायला लागले होते. अक्कलकोटला मात्र st बसने ये जा करणे सहज शक्य होते. घरच जेवण मिळेल म्हणुन बर पणं वाटत होते. कुर्डुवाडीच्या मानाने बँकेत कस्टमर कमी यायचे. प्रथमच cash काउंटर सोडुन काउन्टर वर बसत होतो.
कद्रेकर मी जॉईन झाल्यावर साधारण सहा महिन्याने अक्कलकोटला आले, मूळचे मुंबईचे, पणं जगात्मित्र, मैत्री लगेच करायचे. मी तसें त्यांच्या कडे मित्र म्हणून बघत नव्हतो, कारण पदाने, वयाने मला सिनियर होते.
त्यांचा स्वभाव वरती लिहिल्या प्रमाणे, कोणाचेही सहज मित्र व्हायचे. नेहमी हसतमुख, स्पष्ट बोलणे व स्वतःच्या मतांवर ठाम राहणे ही ठळक वैशिष्ट्ये. बँकेच्या कामाची खुप चांगली माहिती, आणि हो अजुन एक म्हणजे, फाडफाड इंग्लिश बोलणारा मी बघितलेला पहिला व्यक्ती. त्यांचं बोलणं ऐकून मी yes, no स्पष्ट बोलायला शिकलो. नंतर त्यांच्या स्वभावामुळे आमचं सिनियर जुनिअर मधील अंतर लवकर मिटलं. मग शनिवार रविवारी सोलापूरला यायचे.
मी स्कूटर त्यांच्या स्कूटर वर शिकलो, बिचारे माझ्या मुळे एकदा गाडीवरून पडले पणं, पणं मला गाडी शिकवलीच.
एकदा मी व ते, राजदूत वर अक्कलकोट हुन सोलापूरला येत होतो, गाडी चिंचोळीला बंद पडली, त्यांना मी सांगत होतो, तुम्ही st बस नी, पुढे जा, मी गाडी ढकलत आणतो, पणं ते माझ्या साठी, माझ्या बरोबर चालत आले.
तर अश्या ह्या साहेब मित्राशी अजूनही चांगले संबंध आहेत.
मी अडीच वर्षे, अक्कलकोट होतो. 29 जुलै 1991ला शेळगावला बदली झाली. अक्कलकोटला असताना माझ CAIIB Part I पूर्ण झाले, हीच काय ती प्रगती.
क्रमशः
छान... अनेक सहकारी-मित्र जमवलेस!
ReplyDeleteह्यांनीच मला घडवले
Delete