BOI भेटलेले स्मरणीय मित्र भाग 4 प्रकाश कद्रेकर 07/02/1989 हा दिवस मी अक्कलकोट शाखेत जॉईन झालो. पावणे पाच वर्ष कुर्डुवाडीत राहायला लागले होते. अक्कलकोटला मात्र st बसने ये जा करणे सहज शक्य होते. घरच जेवण मिळेल म्हणुन बर पणं वाटत होते. कुर्डुवाडीच्या मानाने बँकेत कस्टमर कमी यायचे. प्रथमच cash काउंटर सोडुन काउन्टर वर बसत होतो. कद्रेकर मी जॉईन झाल्यावर साधारण सहा महिन्याने अक्कलकोटला आले, मूळचे मुंबईचे, पणं जगात्मित्र, मैत्री लगेच करायचे. मी तसें त्यांच्या कडे मित्र म्हणून बघत नव्हतो, कारण पदाने, वयाने मला सिनियर होते. त्यांचा स्वभाव वरती लिहिल्या प्रमाणे, कोणाचेही सहज मित्र व्हायचे. नेहमी हसतमुख, स्पष्ट बोलणे व स्वतःच्या मतांवर ठाम राहणे ही ठळक वैशिष्ट्ये. बँकेच्या कामाची खुप चांगली माहिती, आणि हो अजुन एक म्हणजे, फाडफाड इंग्लिश बोलणारा मी बघितलेला पहिला व्यक्ती. त्यांचं बोलणं ऐकून मी yes, no स्पष्ट बोलायला शिकलो. नंतर त्यांच्या स्वभावामुळे आमचं सिनियर जुनिअर मधील अंतर लवकर मिटलं. मग शनिवार रविवारी सोलापूरला यायचे. मी स्कूटर त्यांच्या स्कूटर वर शिकलो, बिचारे माझ्या मुळे एकद...
Posts
Showing posts from October, 2022
Boi भाग 3
- Get link
- X
- Other Apps
*प्रदीप कांबळे* हा कुर्डुवाडीला एप्रिल 1986 ला रत्नागिरी हुन आला, मूळचा सोलापूरचा, माझ्याहुन तीन साडेतीन वर्षांनी मोठा, आला तेंव्हा विवाहित होता, पणं बायको डिलीव्हरी साठी माहेरी गेली होती. त्याने घर घेतले प असल्याने सतत बरोबरच असायचा, सोलापूरचा असल्यामुळे शनिवारी आम्ही बरोबर येत जातं होतो. प्रदीप आला तेंव्हा त्याने already CAIIB पूर्ण केले होते. त्याच्या बोलण्यात नेहमी Tondon committe, chore committe असले शब्द ऐकायला मिळायला लागले. तो पर्यंत cash मोजणे, ती tally करणे, नंतर cash बुक tally करणे व महिन्याला balancing करणे, एवढेच banking मला माहिती होते. तो असं काही banking बद्दल बोलायचा की मला खुप banking अवघड आहे असे वाटू लागले. मग त्याने मला CAIIB चे रेजिस्ट्रेशन करायला लावले. अभ्यास काही नव्हता पणं त्याच्या संगतीत सुरुवात तर झाली. नंतर माझा part I 1991 ला पुर्ण झाला. तो बॅटबिंटन खेळायचा, ते मात्र मी लगेच जॉईन केल. मी वर्तक साहेब, म्हस्के साहेब व कांबळे असे खेळायला जाऊ लागलो. वर्षभर खेळत होतो. 1987 साली त्याने नवीन आलेली हिरो होंडा घेतली, मग दोघे शनिवारी गाडीवर घरी येत होतो, खुप सोय झाल...
Boi भाग 2
- Get link
- X
- Other Apps
मुकुंद वैद्य येडवे 31/12/1985 ला उमदी इथे बदली होऊन गेला. त्याची जागा *मुकुंद वैद्य* ने घेतली. माझा समवयस्क होता. तो आल्यावर मी तो व सिद्धापूर, एकत्र राहायला लागलो. एका रूम मधून आमची शिफ्टिंग दोन खोल्या असलेल्या घरात झाली. वैद्य चांगला स्वयंपाक करायचा, मग आम्ही घरी स्वयंपाक करायला लागलो, पंपाचा स्टोव्ह काढून गॅस स्टोव्ह आले. तो स्वयंपाक करत असे, माझं व सिद्धापूरचे काम भांडी घासायचे असायचे. सकाळी उठलं की पाणी, भांडी दोनदा चहा व जेवण करून धावत पळत (मी बरका, कारण दोघांचे चालणे फास्ट होते) जायचो. घरी आल्यावर वैद्य सिगारेट ओढत ओढत CAIIB करण किती आवश्यक आहे ते मला समजावून सांगायचं. वैद्य व मी साधारण 3 वर्ष एकत्र राहिलो, तो तसा खुप घाबरट होता, कुर्डुवाडीला एकटा शक्यतो राहायचा नाही. शनिवारी बहुतेक वेळा माझ्या घरी सोलापूरला यायचा, त्यामुळे घरगुती संबंध पणं वाढत गेले. माझा भाच्चा कौस्तुभचा पणं तो वैद्य मामा झाला. 7 जुलै 1987, बँकेत staff home लोन चे परिपत्रक आले, आपण पणं आपले घर घ्यावे म्हणुन माझ्या डोक्यात आले, मग घर बघायला सुरुवात केली, माझ्या बरोबर वैद्य असायचा, तेंव्हा पर्यंत मला भाजी, ...
BOI स्मरणीय मित्र
- Get link
- X
- Other Apps
मला Boi मध्ये भेटलेली स्मरणीय मित्र भाग 1 माझे पहिले पोस्टिंग कुर्डुवाडी 02/05/1984 मी bank जॉईन केल्याचा पहिला दिवस. कुर्डुवाडी इथे मी जॉईन झालो तेंव्हा सर्व जण मला वयाने साधारण चार पाच वर्षांनी मोठे होते. माझी पहिली नोकरी असल्याने मी गेल्यावर माझ्या त्या वेळच्या स्वभानुसार खूपच बुजलेलो होतो. सहा पर्यंत काम केले, आणलेली शबनम बघ गळ्यात अडकवून आता रात्री मुक्काम कुठे करायचा विचार करत होतो, तेवढ्यात मागून आवाज आला, काय विचार करत आहेस, चल माझ्या रूम वर, बिराप्पा येडवे, मला मदत केलेला पहिला साथीदार BOI मधील. आम्ही दोघे गेलो साधारण 100 Sq feet ची खोली होती, त्यातच पूर्वी ज्याला न्हाणी म्हणायचे ती होती. तिथून माझा प्रवास चालु झाला. बिराप्पा येडवे आणि मी साधारण 18 महिने एकच रूम मध्ये राहिलो, बिराप्पा खुप गरीब कुटुंबातून आलेला. खुप इमोशनल पणं मदतीचा हात नेहमीच पुढे असायचा. त्याने पहिल्यांदा एकदम stud नावाची बिअर घरी आणली, मी जेंव्हा प्रथम पाहिली मला खुप घाम फुटला. कारण माझा स्वभाव (त्या वेळचा 😀). झोपताना मला म्हणाला तु पितोस का, मी नजर चुकवून नाही म्हणालो, त्यानं चहाचा कप काढला, घटा घटा ...