Posts

Showing posts from April, 2025

Melbourne 2

 *Tour MCG ची* 6 एप्रिल 2025, रविवार, आज 11 वाजताची MCG टूरची तिकिटे नीरजने काढली होती. तिकीट 37 AUD इतरांना आहे व जेष्ठ नागरिकांना 25 AUD. प्रथमच जेष्ठ नागरीक असल्याचा आनंद झाला. तिकीट जेष्ठ नागरिकांचे काढले होते पण उत्साह मात्र चाळीशीचा होता.  सकाळी नेहमी सारखी 6.30 वाजता जाग आली. उठणार तेंव्हाच लक्षात आले की आज घड्याळ एक तास मागे जाणार आहे म्हणजे अजून 5.30 वाजले आहेत. घड्याळ Auto Adjust केले तेंव्हा 5.30 ची वेळ दर्शवली व परत अजून एक तास झोपायचा प्रयत्न केला. सकाळी 9 वाजता निघायचं ठरले होते. आमचे घर ट्रगनींना ह्या उपनगरात आहे. तिथून टारनेट ह्या उपनगराचे स्टेशन 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. सकाळी 9 वाजता आम्ही बाहेर पडलो ते 9.27 ची ट्रेन टारनेट इथून गाठायचे ह्या हेतूने.  9.27 ची ट्रेन आम्हाला अचूक मिळाली. ही रेल्वे ज्याला इथे V line म्हणतात. इथे काही उपनगर मेट्रोनी जोडली आहेत तर काही V Line म्हणजे Regional ट्रेननी. हा 26 मिनिटाचा प्रवास होता. 26 मिनिटांनी आमची ट्रेन Southern Cross ह्या स्टेशन वर पोहोचली. Southern cross हे आपल्या मुंबईतील VT स्टेशन सारखे आहे. सर्व train इथूनच...

Tarrif युद्ध

 🌎🌏🌏 💫जग तिसऱ्या महायुद्धाकडे झपाट्याने वाटचाल करत आहे. इतके दिवस अमेरिका व सर्व EU देश हे consumption economy चे पुरस्कर्ते होते व अजूनही आहेत. अमेरिकेने गेले कित्येक वर्ष Deficit मध्ये राहून सरकारी खर्च पण खूप केले, त्याचा परिणाम सध्या अमेरिकेवर इतके कर्ज झाले आहे की आता जवळ जवळ त्यांच्या GDP एव्हढे त्यांच्या वर कर्ज आहे.ह्या मुळे इतके वर्ष चीनने हात धुऊन घेतला व जेवढं उत्पादन करत होते तेवढे सर्व विकले जातं होते. आजच्या दिवशी चीन अमेरिकेचा सर्वात मोठा कर्जदाता देश आहे. पण Trump ने उघड उघड चीनविरुद्ध दंड थोपटल्यामुळे 💪 आता चीनची थोडी गोची झाली आहे. काल Trump ने इतर देशावरील Tariff चे issue चर्चेने सोडवूत हे सांगताना Tariff चा निर्णय 90 दिवसांनी पुढे ढकलला व चीन वरचा tariff 125% केला. चीन एवढ्या सहजतेने माघार घेणार नाही हे स्पष्ट आहे. 🤼 तसेच US ने इराण ला दिलेली धमकी, त्यावर रशियाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया, त्या धर्तीवर काल नेतान्याहू ट्रम्प ची झालेली Meeting, दक्षिण आफ्रिकन रिप्रेझेन्टॅटिव्हची ट्रम्प विरोधी केलेल्या निवेदना बद्दल केलेली अमेरिकेतून केलेली हकालपट्टी. दक्षिण ...