@Wealth management at 60. हा भाग सगळ्यात महत्वाचा, आपली पुंजी कुठे गुंतवावी व किती गुंतवावी ह्या बद्दल कायमच मनात गोंधळ असतो. मी particular कोणत्या product मध्ये पैसे गुंतवावेत, ह्याचा सल्ला देणार नाही पण किती व कुठे पैशाची गुंतवणूक करावी हे सांगणार आहे. आपल्या पैशाची गुंतवणूक करताना, आपण 3 गोष्टींचा विचार करावा. 1. *आपण ठेवलेले पैसे व त्यावर मिळणारे पैसे सुरक्षित ठिकाणी आहेत का.* 2. *आपण ठेवलेले पैसे, जेंव्हा हवेत तेंव्हा सहज पणे, रोकड्यात रूपांतरित होतील का, व त्याचा काळ किती असेल.* 3. *आपण गुंतवलेला पैसा, किती काळासाठी गुंतवायचा व त्यावर मिळणारा परतावा किती, व तो कधी मिळेल.* आपले पैसे ह्या तीनही बकेट मध्ये ठेवावेत. कुठे किती व कसे ठेवावेत हे आपण आता बघूत. 1. आपण जे पैसे ठेवतो, तेंव्हा पहिल्यांदा आपल्याला परतावा किती मिळेल, हे प्रथम पाहतो व जास्तीत जास्त पैसा त्या बकेट मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. मित्रानो मिळणारा परतावा व ठेवलेल्या पैशाची आपण जी रिस्क carry करतो, ही नेहमी व्यस्त प्रमाणात असते. ज्या योजने मध्ये ror (rate of returns) जास्त तेथे आपल्या capital ची रिस्क जास्त असते...
Posts
Showing posts from May, 2023
- Get link
- X
- Other Apps
@wealth management at 60 पुष्प 2 आज आपण जेंव्हा साठाव्या वर्षी सेवा निवृत्त होणाऱ्या व्यक्तीस भेटतो, तेंव्हा त्यांना जेष्ठ नागरिक का म्हणावं असा प्रश्न पडतो. पूर्वी आपल्या अगोदरच्या पिढीत सेवा निवृत्त व्यक्ती म्हणजे त्याच्या काही जास्त गरजा नसायच्या, फिरायची आवड नसायची. पण आता तसें राहिलेली नाही, सेवा निवृत्त व्यक्तीच्या इच्छा असतात, त्या ह्या पैशातून त्या इच्छा पूर्ण करायचे असते. सहचारिणीला पण काही मनातील राहिलेली खरेदी असते. तर हा खर्च किती करावा हे आपण ठरवावे. वर नमुद केलेले, (मागच्या लेखात) खर्च अनुक्रमे 1 व 2 ही एक हौस असते, ते किती करावेत तेवढे कमीच असतात *साधारण आपल्याला आलेल्या पुंजीतली 20 ते 30% रक्कम खर्च करावी, हा thumb rule आहे.* कारण राहिलेल्या 70- 80 % रकमेतून आपल्याला राहिलेले अंदाजे 20 ते 25 वर्ष आयुष्याचे सर्व खर्च भगवायचे आहेत. आपण उर्वरित आयुष्य हे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबीच असावे. बऱ्याच ठिकाणी काही सेवा निवृत्तीच्या वेळी Loan शिल्लक असतात. मध्यम वर्गीय लोकांनी हल्ली रिअल इस्टेट मध्ये राहत्या घराचे सोडून, loan घेऊन दुसरे ...