24 तारखेला मुंबईला जाण्यास सकाळी निघालो, नीरज व मुग्धाला पण आजाराचा सिरीयसनेस लक्षात आला होता, मला नीरज, मुग्धा व स्मिताची खूप काळजी वाटू लागली होती, आपण नसताना ह्यांचे कसे होईल असे वाटत होते. त्या तीघांना माझी काळजी वाटत होती, सकाळी सगळे मुंबईला गेलो, बरोबर 1.15 मिनिटांनी सोमय्याला पोहोचलो. बरोबर 2 वाजता Dr चा 10 मिनिटात येतो म्हणून फोन आला. 10 मिनिट चर्चा केली. सगळं ऐकून CD बघितल्या वर चर्चा करुत म्हणाले. CD घेऊन तेथील cathlab मध्ये गेले, 5 मिनिटात वर बोलावलं, परत सरांनी सर्व explain केले व TMT करायचा सल्ला दिला, मी पायात रॉड असल्यामुळे TMT करता येत नसल्याचे सांगितलं, मग DSE test करायला सांगितली व ती पण ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथेच. माझा भाऊ नितीन ह्याने सर्व किती सिरीयस आहे व urgent आहे असे विचारलं, बद्दल काही बोलले नाहीत पण urgent नाही हे आवर्जून सांगितले, ज्युपिटर हॉस्पिटलची 29/12 तारखेला 12.40 वाजताची अपॉइंटमेंट मिळाली. ठरवल्या प्रमाणे तिथे गेलो, बरोबर 12.40 ला आत बोलावले, ही test काय असते ते प्रथम तेथील एका जुनिअर dr ने सांगितलं. Dobutomine stress echo test ही ज्या p...
Posts
Showing posts from January, 2023
- Get link
- X
- Other Apps
हृदय रोग आणि मी मला पहिला हार्ट attack आला, तो अगदीच अनपेक्षित पणे, म्हणजे झालं असं, चारचा सुमार होता, प्रचंड उकडत होते, जांभळे खात गॅलरीत उभा होतो, अचानक घश्यात काहीतरी अडकल्या सारखं झालं, दरदरुन घाम आला, आत बेडरूम मध्ये गेलो, ac चालु केला व जरा पडलो, काही कमी होईना, तडक कपडे घातले, मनात संशयाची पाल चुकचुकली, स्मिताला सांगितलं व तडक नजीकच्या hospital मध्ये गेलो, Bp 180/110 होता. हार्ट बीट्स वाढले होते.डॉ नी 2 D केली व हार्ट अटॅक होता हे जाहीर केलं. नीरज व स्मिता खूप घाबरले होते, पण मला जास्त भीती वाटत नव्हती, कारण 2006 ला माझे boss श्री व्होरा ह्यांना असाच त्रास झाला होता, व hotel centaur पासून पनवेल पर्यंत rescue केलं होते, तेंव्हा त्या दोन तासात होणारे सर्व changes मी पाहिले होते, पण त्यामुळे मी ताबडतोब हा हार्ट अटॅक आहे व लगेच medical help घ्यावी, हे डोक्यात बसले होते. असो. नंतर 8 दिवसांनी angioplasty MGM वाशीला झाली व नंतर 8-9 वर्ष खाण्याची सर्व पथ्यं बारकाईने पाळत होतो. मनात एकहोते; परत असे घडायला नको. रेग्युलर lipid प्रोफाइल करून, वाईट cholesterol वाढणार नाही ह्...