जलोटा
*मला भेटलेल्या व्यक्ती* बँकेत साधारण 39 वर्ष 2 महिने नोकरी केली, निरनिराळी ठिकाणे, वेगळे काम, वेगळे वरिष्ठ अधिकारी पाहिले. त्यातलेच एक *जलोटा* ह्यांच्या बद्दल मी लिहीत आहे. मी गांधीनगरला 3 सप्टेंबर 2017 ला जॉईन झालो. ह्या दिवशी मी गांधीनगर शाखेत रुजू झालो, नंतर 21 जून 2018 ला *जलोटा* साहेबांच्या office मध्ये *Credit Dept Incharge* म्हणून झोनल office मध्ये जॉईन झालो व नंतर दररोज साहेबांशी संबंध येऊ लागला. *जलोटा* साहेब, अतिशय कमी बोलायचे. चेहऱ्यावर सतत स्मित हास्य असायचे. केबिन अतिशय व्यवस्थित ठेवलेले असायचे. दिवसाच्या सुरुवातीला व संध्याकाळी जाताना टेबलं वर एकही फाईल नसायची. म्हणजे जेवढ्या फाईल यायच्या तेवढ्या पूर्ण dispose झालेल्या असायच्या. सकाळी बरोबर 10 वाजता office मध्ये यायचे व 7 वाजता बाहेर पढायचे. आठवड्यात एकदा Dept चा review व्हायचा, छोट्यातल्या छोट्या pending मेमो बद्दल उहापोह व्हायचा, त्याच्या disposal ची timeline द्यायचे व नंतर त्याचा follow up, अतिशय शिस्त प्रिय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करायचा छान अनुभव होता. पण हे अतिशय कमी बोलायचे. मी त्यांच्या शेजार...