एक अविस्मरणीय दिवस
*एक अविस्मरणीय दिवस* काल ह दे 78 च्या बॅच मधील सर्व मुला मुलींची सामुदाईक एकसष्टी काल अभिषेक मळा संपन्न झाला. अतिशय हृद्य कार्यक्रम झाला साधारण 75 जणांची सामुदाईक एकसष्ठि होण्याचा हा पहिलाच व एकमेव कार्यक्रम असावा. अभिषेक मळ्याचे सर्वे सर्वा श्री राजाभाऊ भंडारकवठेकर हे पण आमचे वर्गमित्र. हा कार्यक्रम त्यांच्या पुढाकाराने व पूर्ण कार्यक्रम त्यांनी स्पॉन्सर केला होता. आमच्या ह्या ग्रुप मध्ये कोणीतरी काही कल्पना व्यक्त करायची व बाकी सर्वांनी ती सिद्धीला न्यायची हा आता एक पायांडाच पडला आहे. कालच्या कार्यक्रमाला निमच, बेंगलोर, पुणे, मुंबई, कोल्हापूर व इतर सर्व भागातून आले होते. कितीतरी मुला मुलींचे partners आता ह्या जगात नाहीत, त्यांची एकसष्ठि होणार नाही हे माहिती आयोजकांना माहिती होते, म्हणून हा एक यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. हल्लीच्या जगात जवळच्या नातेवाईक पण पुढाकार घेऊन अस आयोजन करत नाहीत, पण कोणा एके काळी एकत्र तीन चार वर्ष घालवलेले मुलं मुली एकत्र येऊन असा कार्यक्रम साजरा करणे हा स्तुत्य उपक्रम होता. कार्यक्रमाची सुरुवात नाष्टा व फळाहारने झाली, सर्वाना पोट भरून नाष्...