Posts

Showing posts from April, 2023
 @wealth management at 60 मी आज पासून, ही लेखमाला लिहायला सुरुवात करत आहे. आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी पहिले पुष्प गुंफताना खूप आनंद होत आहे. *आपली wealth अक्षय राहो हीच आजच्या दिवशी प्रार्थना.* साठाव वर्ष हे निवृत्तीचं वर्ष. सेवानिवृत्तीच वर्ष. ह्या वर्षी सेवा निवृत्ती पश्चात मिळणारे सर्व पैसे एकत्र मिळतात. आयष्यभर कमाई करुन मिळवलेली पुंजी असते ती. मग आपले सर्व नातेवाईक, त्याचा विनियोग अथवा गुंतवणूक कशी करायची ह्या बद्दल सल्ला देऊ लागतात. जास्त परतावा असलेल्या स्कीम, तीन वर्षात पैसे दामदुप्पट करुन देणारे आपल्या आसपास येऊ लागतात. पैसे मिळाल्यावर *पहिले तत्व ठेवायचे ते capital protection.*  *Capital Protection.* सेवानिवृत्ती नंतर काही लोकांना काही ठराविक रक्कम मिळते व निवृत्ती वेतन चालु होते तर काही जणांना केवळ बक्कळ रक्कम मिळते. ज्या लोकांना बक्कळ रक्कम मिळते त्यांना उर्वरित आयुष्यात दररोजचा खर्च आपला व पत्नीचा ह्याच रक्कम गुंतवणूकितील परताव्यातून करावा लागतो. म्हणुन आलेली रक्कम खूप विचार करुन गुंतवावी लागते. वर नमुद केल्या प्रमाणे आपले पैसे एकत्र मिळाले की त्याला खूप वाटा फ...