Adelaide 1
Adelaide Oval ची सफर साधारण Mar 2013 ला लंडनला बँकेच्या कामासाठी जाण्याचा योग आला होता, तेंव्हा ज्याला क्रिकेटची मक्का म्हणतात अश्या लॉर्ड्सवर पण गेलो होतो, पण तेंव्हा बर्फवृष्टी होत असल्याने सगळं ग्राउंड व्यवस्थित पाहायला मिळाले नव्हते. आज 2023 ला बरोबर 10 वर्षानंतर, क्रिकेटचा देव ज्या ग्राऊंडवर मोठा झाला, *नवनवीन record बनवली त्या डॉन Bradman चे होम ग्राउंड Adelaide oval बघण्याचा योग आला*. Oval अतिशय छान ग्राउंड आहे, ह्या ग्राऊंडवर जेव्हढे क्रिकेट खेळले जाते, तेव्हढेच फुटबॉल, व रगबी पण. Adelaide हे SA मधील एक महत्वाचे शहर. Bradman 1936 साली, सिडनीहून South ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाले व त्या वर्षीची शेफिल्ड शिल्ड त्यांनी ह्या संघाकडून खेळून, दोन त्रिशतक score केली. ह्या वर्षीची शिल्ड SA ला मिळाली. Bradman नी 399 runs पण ह्याच ग्राऊंडवर score केले. ह्या स्टेडियम वर Bradman Collection वर एक वेगळे दालन आहे. त्याच्या प्रवेशद्वारावर एक वाक्य लिहिले आहे, ते असे *I was not coached, I was not told how to hold the bat* व खाली क्रिकेट देवाची सही आहे. Bradman retire झ...